Savitribai Phule Jayanti 2025: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट
सातारा मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मघरी भेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा मधील नायगाव येथे असलेल्या त्यांच्या जन्मघरी पोहचले आहेत. यावेळी त्यांनी सावित्रीबाईंच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, मंत्री आदिती तटकरे देखील होत्या. दरम्यान सावित्रीबाई फुले या भारतामधील पहिल्या शिक्षिका आहेत. आज त्यांच्यामुळे समाजात स्त्रिया आणि मुलींसाठी शिक्षण घेण्याची कवाडं खुली झाली आहेत. 1955 पासून महाराष्ट्र शासन हा दिवस 'बालिका दिवस' म्हणून साजरा करत आहे. Balika Diwas 2025 HD Images: बालिका दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Photos!
सातारा मध्ये पोहचले सीएम फडणवीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)