Chain Snatching in Nashik: व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून साथीदारासह काढला पळ, घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)

चोराने महिलेची सोनसाखळी हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला. याबाबत एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Chain Snatching in Nashik (संग्रहित संपादित प्रतिमा)

Chain Snatching Caught on Camera in Nashik: नाशिक शहरात महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरण्यात आल्याची घटना समोर आली. अहवालानुसार, सोमवारी, 5 ऑगस्ट रोजी ही चेन स्नॅचिंगची घटना घडली. चोराने महिलेची सोनसाखळी हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला. याबाबत एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ 6 ऑगस्ट रोजी ऑनलाइन समोर आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दुचाकीवरून आलेले दोन पुरुष स्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेज थांबतात. त्यापैकी एक खाली उताराव आणि फोनवर असल्याचे भासवत कोणाचे तरी घर शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवतो. बराच वेळ तो महिलेच्या आजूबाजूला रेंगाळतो. त्यानंतर संधी मिळताच तो महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून, मोटारसायकलवरून निघून जातो. (हेही वाचा: Cyber Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळेबाजांकडून वसूल केली 100 कोटी रुपयांची फसवणूक केलेली रक्कम; 35,918 तक्रारींचे केले निवारण)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)