BJP Maharashtra Candidates List: भाजपकडून लोकसभेसाठी महाराष्ट्रातील 20 नावांची घोषणा; नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी

भाजपच्या दुसऱ्या यादीत 72 नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामाधून एकूण 20 जागांवरील नावांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP Maharashtra Candidates List: भाजपकडून लोकसभेसाठी महाराष्ट्रातील 20 नावांची घोषणा; नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी
Pankaja Munde, Nitin Gadkari, Sudhir Mungantiwar | (Photo credit: Archived, edited and representative images)

BJP Maharashtra Candidates List: भारतीय जनता पक्षाने बुधवारी (13 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत 72 नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामाधून एकूण 20 जागांवरील नावांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गडकरी या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. याशिवाय उत्तर मुंबईमधून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाली आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जालना येथून रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगर येथून सुजय विखे-पाटील, बीडमधून पंकजा मुंडे तर सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीसाठी सरसावले नागपूरकर)

पहा संपूर्ण यादी-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2024 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).