Bhiwandi, GF Cuts BF's Private Part: प्रियकराने लग्न करण्यास दिला नकार; प्रेयसीने त्याच्या प्रायव्हेट पार्टसवर केला चाकू हल्ला, भिवंडीमधील धक्कादायक घटना

ही घटना 16 ऑगस्ट रोजी भिवंडी परिसरात घडली होती. इथल्या पद्मा नगर भागात महिलेने आपल्या 31 वर्षीय प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

Stabbing | Image Used for Representational Purpose (Photo Credits: Maxpixel)

Bhiwandi, GF Cuts BF's Private Part: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 26 वर्षीय महिलेने आपल्या जोडीदाराच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने हल्ला केल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या महिलेने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा तिने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने हल्ला केला आणि त्याला जखमी केले. यानंतर पीडितेने तातडीने हॉस्पिटल गाठले. नंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा; Haryna Crime: संतापजनक! प्रेमाला नकार दिल्यामुळे वरिष्ठ डॉक्टराकडून विद्यार्थीनीचा शारीरिक छळ, गुन्हा दाखल)

प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टसवर केला चाकू हल्ला-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now