Bhiwandi: भिवंडीमध्ये ज्वलनशील रसायनाने भरलेल्या ड्रमचा स्फोट; दोघांचा मृत्यू

ही घटना शहरातील तळवली नाका येथील सुमित हॉटेलजवळ सकाळी 8.35 च्या सुमारास घडली.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ठाण्याच्या भिवंडी येथे आज, 1 फेब्रुवारी रोजी ज्वलनशील रसायनाने भरलेल्या ड्रमचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना शहरातील तळवली नाका येथील सुमित हॉटेलजवळ सकाळी 8.35 च्या सुमारास घडली. रमजान मोहम्मद जमील शेख (45) आणि मोहम्मद इस्माईल शेख (38) अशी दोन मृतांची नावे आहेत, ते भंगार व्यापारी होते. एका व्यक्तीने डायथिलीन ग्लायकोल असलेल्या ड्रमजवळ सिगारेट पेटवल्याने या ड्रमचा स्फोट झाला व त्यात दोघांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी पीटीआयला सांगितले की, आगीत चार ड्रम फुटले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now