Thane: भिवंडीत इमारतीच्या टेरेसवर हस्तमैथुन करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक; गुन्हा दाखल
इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचे हे कृत्य कैद झाले आहे. आरोपीचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना विनयभंग झाल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
इमारतीच्या टेरेसवर हस्तमैथुन (Masturbation) केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोहम्मद रेयान सिद्दीकी असे आरोपीचे नाव असून तो भिवंडीचा रहिवासी आहे. गुरुवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 (शब्द, हावभाव किंवा कृत्य याद्वारे महिलेच्या शिष्टाचाराचा अपमान करण्याचा हेतू) आणि 329 (2) (गुन्हेगारी अतिक्रमण किंवा घरातील अतिक्रमण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कथितपणे इमारतीत घुसखोरी केली आणि टेरेसवर गेला. त्याने आपली पॅन्ट अनझिप केली आणि गच्चीवर सुकविण्यासाठी ठेवलेल्या कपड्यांवर हस्तमैथुन केले.
इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचे हे कृत्य कैद झाले आहे. आरोपीचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना विनयभंग झाल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (हेही वाचा: Kota Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांची शिक्षा)
शांतीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील म्हणाले, ‘फिर्यादी आणि इतर महिलांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला. आम्ही आरोपीचा अस्पष्ट फोटो माहिती देणाऱ्यांना प्रसारित केला. आम्ही त्याचा शोध घेतला, त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले, आणि त्याला दंडाधिकारी कोठडीत पाठवले. जामीनपात्र गुन्ह्यामुळे आरोपीला जामिनावर वाढ करण्यात आली आहे.’ पाटील पुढे म्हणाले की, प्राथमिक तपासात आरोपीने याआधी अनेकवेळा महिला रहिवाशांच्या कपड्यांवर हस्तमैथुन केल्याचे समजले.
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2024 10:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

