महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ; मार्च 2024 पासून लागू, Devendra Fadnavis यांची माहिती
ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे. कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात वाढ केल्यामुळे आता राज्यातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने, आता तसेच ज्या कंत्राटी कामगारांवर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा कंत्राटी कामगारांबाबत विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: आपत्तीग्रस्त लोकांना दिलासा! आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत, राज्य शासनाचा मोठा निर्णय)
महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ-