मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण; मंत्री अमित देशमुख यांनी तातडीने मागवला अहवाल

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली आहे

Image For Representation (Photo Credits: IANS)

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या आहेत. 25 डिसेंबर रोजी मुलींच्या वसतिगृहातील नाताळच्या पार्टीनंतर कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय आहे. शनिवारपासून येथे दरारोज कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement