Navratri Colors 2021 Day 1: नवरात्रीचा दिवस पहिला! पहा कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल

नऊ दिवसांच्या या उत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग दिलेला असतो. त्यानुसार साडी, वस्त्र परिधान केले जातात.

Navratri 2021 (File Photo )

यंदा नवरात्रोउत्सव गुरुवार, 7 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा यासोबत नऊ रंगाचे कपडे घालण्याची महिला वर्गामध्ये उत्सुकता असते. नऊ दिवसांच्या या उत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग दिलेला असतो. त्यानुसार साडी, वस्त्र परिधान केले जातात. अलिकडच्या काळात हा ट्रेंड सेट झाला आहे. विशेष म्हणजे याला केवळ महिलांकडूनच नाही तर पुरुषांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Navratri 2021 Messages: नवरात्र आणि घटस्थापनेच्या मंगल प्रसंगी खास मराठी Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा)

नवरात्रीचा पहिला दिवस 7 ऑक्टोबरला असून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या वर्षी 7 ऑक्टोबर 2021 रोजी शैलपुत्री देवीचा दिवस आहे. या दिवशी मातेची पिवळ्या रंगाची वस्त्रे घालून पूजा करावी.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement