MBBS Degree In 1 Month: अभ्यास नाही, परीक्षा नाही; व्यक्तीला 16 लाख भरून एका महिन्यात मिळाली एमबीबीएसची पदवी
2019 च्या या प्रकरणी पोलिसांनी आता 5 वर्षांनंतर, 14 जून रोजी तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी एफआयआर नोंदवला. अशाप्रकारे आता प्रवेश न घेता आणि परीक्षा न देता एमबीबीएस झालेल्या होमिओपॅथी डॉक्टरची फसवणूक झाल्याची ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे.
MBBS Degree In 1 Month: देशात सध्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट युजी 2024 मध्ये कथित अनियमिततेबद्दल गोंधळ सुरूच आहे. अशात उत्तर गुजरातमधील मेहसाणा येथून वैद्यकीय शिक्षणामध्ये फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या पाच वर्षे जुन्या प्रकरणात, मेहसाणा येथील रहिवाशाने एमबीबीएस पदवीसाठी यूपीमधील एका व्यक्तीला 16.3 लाख रुपये दिले होते, त्यानंतर या होमिओपॅथ डॉक्टरला महिनाभरात पदवीदेखील मिळाली, मात्र तपासणीत ही पदवी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. 2019 च्या या प्रकरणी पोलिसांनी आता 5 वर्षांनंतर, 14 जून रोजी तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी एफआयआर नोंदवला. अशाप्रकारे आता प्रवेश न घेता आणि परीक्षा न देता एमबीबीएस झालेल्या होमिओपॅथी डॉक्टरची फसवणूक झाल्याची ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे. (हेही वाचा: Nitin Gadkari On Bihar Bridge Collapsed: बिहारमध्ये कोसळलेला पूल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत बांधण्यात आला नव्हता; नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)