Jay Shah Refused to Hold Indian National Flag: जय शाह यांनी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारण्यास नकार, विरोधकांचा दावा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मात्र त्याला जय शाह नकार देतात. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. जय शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे

बीसीसीआय आणि एसीसीचे अध्यक्ष तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव असलेले जय शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारत-पाकीस्तान सामन्यादरम्यान भारताचा विजय झाला. तेव्हा मैदानात एकच जल्लोष झाला. या वेळी जय शाह हेदेखील उपस्थित होते. जय शहा हेदेखील विजयाचा आनंद साजरा करत होते. दरम्यान, त्यांना एका व्यक्तीने भारताचा राष्ट्रध्वज ऑफर केला. मात्र, राष्ट्रध्वज हातात घेऊन विजयाचा आनंद व्यक्त करायला त्यांनी नगार दिला. व्हिडिओत एक व्यक्ती राष्ट्रध्वज ऑफर करताना दिसतो. मात्र त्याला जय शाह नकार देतात. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. जय शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)