India's Retail Inflation Eases: देशातील किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 6.83 टक्क्यांपर्यंत घसरली
जुलै महिन्यात भाज्यांची महागाई गगनाला भिडली होती. यावेळी टॉमेटाचा दर हा 200 च्या पार गेला होता
सरकारने ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकात (सीपीआय) घसरण झाली असून, ती 6.83 टक्क्यांवर आली आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाई 7.44 या 15 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली होती. जुलै 2023 मध्ये अन्नधान्य महागाई 11.51 टक्के होती, जी ऑगस्टमध्ये 9.94 टक्क्यांवर आली. ग्रामीण भागातील महागाई ऑगस्टमध्ये 7.02 टक्क्यांवर आली आहे, जी जुलैमध्ये 7.63 टक्के होती. जुलै महिन्यात भाज्यांची महागाई गगनाला भिडली होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Hospitality Industry: भू-राजकीय अनिश्चितता असूनही विस्तारला भारतीय आतिथ्य उद्योग; पुढच्या दोन वर्षात अनेक संधी, वाचा सविस्तर
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Home-Cooked Thali Costs Decline: सर्वसामान्यांना दिलासा! एप्रिलमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमतीत 4 टक्के घट: Crisil
Advertisement
Advertisement
Advertisement