Indian Army Cheetah helicopter Crash: बेपत्ता दोन्ही पायलट्स मृत्यूमुखी - लष्कराची माहिती

त्यामधील वैमानिक मृत्यूमुखी पडले असल्याची दु:खद वृत्त आता आर्मीने शेअर केले आहे.

Indian Army Helicopter | (File Image)

अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरला आज सकाळी अपघात झाला. या अपघातामधील दोन्ही पायलट्स मृत्युमुखी पडले असल्याचे वृत्त लष्कराने दिले आहे. सकाळी सव्वा नऊ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तातडीने पायलट्सचं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले पण त्यांचे मृतदेह आढळले आहेत. बांगलाजाप गावाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. नक्की वाचा: Indian Army Cheetah Helicopter Crashed: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अरुणाचल प्रदेश राज्यातील मंडला हिल्स परिसरातील घटना .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)