Hathras Stampede Incident: हातरस चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू; पोलिसांकडून पहिली मोठी कारवाई, सहा सेवेदारांना अटक, मुख्य आयोजकावर एक लाखाचे बक्षीस

मुख्य आयोजक प्रकाश मधुकरवर अजूनही फरार असून, त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माथूर म्हणाले, पोलीस लवकरच मधुकरविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करणार आहेत.

Hathras Stampede Incident

Hathras Stampede Incident: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या तिसऱ्या दिवशी आज (गुरुवार) सहा जणांना अटक करण्यात आली. अलिगडचे आयजी रेंज शलभ माथूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, अटक करण्यात आलेले सहा आरोपी हे आयोजन समितीचे सदस्य आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुख्य आयोजक प्रकाश मधुकरवर अजूनही फरार असून, त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माथूर म्हणाले, पोलीस लवकरच मधुकरविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करणार आहेत. गरज पडल्यास बाबाचीही चौकशी केली जाईल. चौकशीनंतर आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. हे आरोपी सेवादार म्हणून काम करतात. हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरीमुळे 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेहांची ओळख पटली असून शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (हेही वाचा: Bhole Baba's First Responce After Stampede Incident: 'समाजकंटकांमुळे झाली चेंगराचेंगरी'; हाथरस घटनेनंतर समोर आली फरार भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया)

पहा पोस्ट- 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement