Gurugram Restaurant Shocker: माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर तोंडात सुरु झाली जळजळ, रक्ताच्या उलट्या; गुरुग्रामच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल (Watch Video)
त्याचवेळी लोकांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडेही मदत मागितली, मात्र रेस्टॉरंटच्या एकाही कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही.
Gurugram Restaurant Shocker: जर तुम्हीही रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर बडीशेप किंवा माऊथ फ्रेशनर खात असाल, तर सावध व्हा. हे माऊथ फ्रेशनर तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकते. नुकतेच गुरूग्राममध्ये असे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे Laforestta Cafe - Bar & Restaurant नावाच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या तीन जोडप्यांना जेवण झाल्यानंतर वेटरने माऊथ फ्रेशनर दिले. मात्र ते सेवन करताच प्रत्येकाच्या तोंडात जळजळ होऊ लागली आणि काही समजण्यापूर्वीच त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून लोक घाबरले आणि पाण्याने चुळा भरू लागले, मात्र काही फरक पडला नाही. त्याचवेळी लोकांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडेही मदत मागितली, मात्र रेस्टॉरंटच्या एकाही कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यानंतर या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात दाखल केले. यातील जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या लोकांच्या तोंडातून रक्त येताना दिसत आहे. घडल्या प्रकाराबाबत याबाबत खेडकिदौला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा: Viral Video: मुलगा, सुनेने केली मानसिक आजारी असलेल्या वृद्ध वडिलांना मारहाण, व्हिडीओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)