Go First Suspend Flights: गो फर्स्ट एअरलाइन्सने रद्द केली आपली 3 आणि 4 मे रोजीची सर्व उड्डाणे; DGCA ने दिली माहिती

विमान कंपनीला रोख रकमेची तीव्र टंचाई आहे. पेट्रोलियम कंपन्यांची थकबाकी न भरल्यामुळे, गो फर्स्ट एअरलाइनने 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणे रद्द केली आहेत.

Go First Airline (PC - ANI)

देशातील ज्या प्रवाशांनी 3 आणि 4 मे रोजी गो फर्स्ट (GoFirst) एअरलाइन्सची तिकिटे बुक केली आहेत त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. गो फर्स्टने 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणे रद्द केली आहेत. तेल कंपन्यांची थकबाकी भरू न शकल्याने विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, एका तेल विपणन कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गो फर्स्ट कॅश आणि कॅरी मोडवर काम करत आहे. म्हणजेच, विमान कंपनीला दररोज उड्डाण करायच्या संख्येनुसार हवाई इंधनाचे पैसे द्यावे लागतात. एअरलाइन्सनी हे मान्य केले आहे की, पेमेंट न केल्यास उड्डाणे ठप्प होऊ शकतील. विमान कंपनीला रोख रकमेची तीव्र टंचाई आहे. पेट्रोलियम कंपन्यांची थकबाकी न भरल्यामुळे, गो फर्स्ट  एअरलाइनने 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणे रद्द केली आहेत. (हेही वाचा: मार्गन स्टॅनली बँक पुन्हा करणार कर्मचारी कपात, 3000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement