कर्नाटक मध्ये Dutch vlogger Pedro Mota सोबत वर्दळीच्या रस्त्यात गैरवर्तणूक; पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Pedro Mota असं परदेशी टुरिस्टचं नाव आहे.
भारतामध्ये अनेकदा परदेशी पर्यटकांना वाईट अनुभव येतात. नुकताच एका डच व्लॉगर सोबत देखील असाच प्रकार घडला आहे. कर्नाटकातील बेंगलूरू मध्ये वर्दळीच्या रस्त्यात फिरताना त्याच्यासोबत गैरवर्तणूक झाली आहे. रस्त्यावर व्लॉगर युट्युब व्हिडिओ शूट करत असताना त्याला त्रास देण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. दरम्यान परदेशी नागरिकाच्या तक्रारीवरून Navab Hayath Sharif विरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. Karnataka Police Act Section 92 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईच्या Khar परिसरामध्ये विनयभंग झालेल्या South Korean YouTuber Hyojeong Park ची पोलिस कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; पहा काय म्हणाली .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)