Defamation Case: गुजरात उच्च न्यायालयाकडून Rahul Gandhi यांना सध्या कोणताही दिलासा नाही; न्यायालय सुट्टीनंतर देणार निकाल

मोदी आडनाव प्रकरणी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर सुरत जिल्ह्यातील एका न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Defamation Case: गुजरात उच्च न्यायालयाकडून Rahul Gandhi यांना सध्या कोणताही दिलासा नाही; न्यायालय सुट्टीनंतर देणार निकाल
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानीच्या प्रकरणात दाखल केलेल्या फौजदारी पुनरीक्षण याचिकेवर मंगळवारी (2 मे) गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा नाकारताना शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी राहुल गांधींच्या अपीलवर गुजरात उच्च न्यायालय सुटीनंतर निकाल देणार आहे.

मोदी आडनाव प्रकरणी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर सुरत जिल्ह्यातील एका न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. (हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).