Car Falls In Waterfall Video: इंदोरच्या सिमरोल परिसरात कार थेट तलावात पडली; व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले 3 जणांचे प्राण (Watch)

या घटनेमागे कुटुंबातील वडिलांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. हँडब्रेक न लावता त्यांनी आपली कार तलावाजवळ उभी केली होती. या अपघातात वडील आणि मुलगी जखमी झाले आहेत.

Car Falls In Waterfall Video: इंदोरच्या सिमरोल परिसरात कार थेट तलावात पडली; व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले 3 जणांचे प्राण (Watch)
Car Falls In Waterfall Video

मध्य प्रदेशातील इंदूरजवळील सिमरोल येथे एक कार धबधब्याजवळील पाण्याने पडल्याची धक्कादायक घटना घडली. महत्वाचे म्हणजे त्यावेळी कारमध्ये तीन जण बसले होते. ही कार वरून थेट पाण्यात पडली. घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने पाण्यात उडी मारून या लोकांचे जीव वाचवले. सध्या या अपघातात व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमागे कुटुंबातील वडिलांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. हँडब्रेक न लावता त्यांनी आपली कार तलावाजवळ उभी केली होती. या अपघातात वडील आणि मुलगी जखमी झाले आहेत. त्यांना इंदूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. गाडी पाण्यात बुडताना पाहून इंदूर येथे राहणाऱ्या सुमित मॅथ्यू याने सर्वप्रथम पाण्यात उडी मारली, त्यानंतर  सुमितच्या मागे आणखी दोन तरुणही मदतीला धावले. (हेही वाचा: Viral Video: चीनमध्ये मुसळधार पाऊस! भरधाव वेगात आलेली SUV कोसळली खड्ड्यात, Watch)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2023 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).