BJP Offering Free Recharge? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या आनंदात भाजप 'फ्री रिचार्ज' देत असल्याचा दावा; जाणून घ्या काय आहे सत्य
या मेसेजमध्ये एक लिंकही शेअर केली आहे.
Free Recharge: भारतात यंदा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले आहे. मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी व्हॉट्सॲप आणि सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीएम मोदींचे नाव वापरून फ्री रिचार्जचे आश्वासन दिले जात आहे. या मेसेजमध्ये एक लिंकही शेअर केली आहे. व्हॉट्सॲपवरील या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या आनंदात, भाजप पक्षाने सर्व भारतीय वापरकर्त्यांना 599 रुपयांचे 3 महिने मोफत रिचार्ज देण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे खालील लिंकवर क्लिक करून तुमच्या नंबरवर मोफत रिचार्ज मिळवा.’
या संदेश व्हायरल झाल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने याची सत्यता तपासली आणि सांगितले की, हा दावा पूर्णतः खोटा आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. लोकांची फसवणूक करण्याचा सायबर चोरांचा हा प्रयत्न आहे. पीआयबीने अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आजकाल सायबर ठग निष्पाप लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. (हेही वाचा: WhatsApp Bans 70 Lakh Indian Users: भारतातील तब्बल 70 लाख व्हॉट्सॲप वापरकर्त्यांवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)