Chinar Corps: भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे इंस्टाग्राम अंकाउट सुरु, एका आठवड्यासाठी करण्यात आले होते बंद

एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'फेसबुक आणि इंस्टाग्रामने चिनार कॉर्प्सचे हँडल ब्लॉक केले होते. हे एक आठवड्यापेक्षा जास्त काळ केले गेले होते आणि या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Instagram (Photo Credits-File Image)

भारतीय लष्कराच्या (Indian Army) श्रीनगर येथील चिनार कॉर्प्सचे (Chinar Corps) इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account) बुधवारी सक्रिय झाले आहे. आठवडाभराहून अधिक काळ ते बंद करण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉर्प्सचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अंकाउट एका आठवड्यापूर्वी बंद करण्यात आले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'फेसबुक आणि इंस्टाग्रामने चिनार कॉर्प्सचे हँडल ब्लॉक केले होते. हे एक आठवड्यापेक्षा जास्त काळ केले गेले होते आणि या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement