HC on Wife's Extramarital Affair: 'विवाहबाह्य संबंध असलेल्या पत्नीला मिळू शकत नाही पोटगी'; Karnataka High Court चा मोठा निर्णय

न्यायमूर्ती राजेंद्र बदामीकर यांच्या एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी पत्नीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली,

Court (Image - Pixabay)

नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात, कर्नाटक उच्च न्यायालयाने  निरीक्षण नोंदवले की, एखादी पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत व्यभिचारी संबंध ठेवत असेल तर तिला पतीपासून पोटगी मिळू शकत नाही. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 च्या कलम 12 अन्वये आर्थिक सहाय्य मिळवण्याच्या उद्देशाने दाखल केलेली एका महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने पत्नी ‘विवाहबाह्य संबंधांमध्ये’ सहभागी असल्याचे दर्शविणाऱ्या स्पष्ट पुराव्याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने ठामपणे सांगितले की, जेव्हा व्यभिचार सिद्ध होतो तेव्हा पत्नीला भरणपोषणाचा हक्क लागू होत नाही.

न्यायमूर्ती राजेंद्र बदामीकर यांच्या एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी पत्नीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली, त्या बदल्यात दंडाधिकारी न्यायालयाने पत्नीच्या बाजूने दिलेला भरणपोषणाचा आदेश रद्दबातल ठरवला. (हेही वाचा: HC On Validation Of Hindu Marriage: हिंदू कायदा वैध विवाहासाठी 'सप्तपदी' आवश्यक घटकांपैकी एक; अलहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement