गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात नृत्य सादर करताना हृदयविकाराच्या झटक्याने कलाकाराचा मृ्त्यू

गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात प्रेक्षकांसमोर नाचताना दिसत होता. सादरीकरण करत असताना तो अचानक कोसळला.

Yogesh Gupta

योगेश गुप्ता नावाच्या रंगमंचावरील कलाकाराचा बुधवारी जम्मूतील बिश्नाह (Bishnah) भागात परफॉर्म करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जम्मूतील कोठे गावात गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात नृत्य सादर करताना कलाकार कोसळला. एका व्हिडिओ क्लिपमध्ये, कलाकार महिलेच्या वेशात होता. गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात प्रेक्षकांसमोर नाचताना दिसत होता. सादरीकरण करत असताना तो अचानक कोसळला. प्रेक्षकांचा विश्वास बसला की तो नाटकात आपली भूमिका बजावत आहे. त्याचा सहकलाकारच स्टेजवर आला. उठवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्याने मदतीसाठी हाक मारली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif