Zomato मागे घेतली Hrithik Roshan स्टारर 'महाकाल'ची जाहिरात; मागितली माफी

कंपनीवर जोरदार बहिष्काराच्या मागणीनंतर आता फूड डिलिव्हरी कंपनीने माफी मागितली आहे.

Zomato Logo (Photo Credits: Facebook)

झोमॅटो (Zomato) ने हृतिक रोशन अभिनीत आपली एक जाहिरात बंद करून त्याबद्दल माफी मागितली आहे. या जाहिरातीमध्ये झोमॅटोच्या फूट डिलिव्हरी बॉयकडून पॅकेट घेतल्यानंतर हृतिक रोशन एक ओळ बोलताना दिसत होता आणि ती ओळ होती- 'थाली का मन किया, उज्जैन में हैं, तो महाकाल से मंगा लिया.' हृतिकच्या या जाहिरातीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जाहिरातीला विरोध केला होता. त्यानंतर सोशल मिडियावरही या जाहिरातीबाबत टीका होऊ लागली होती. कंपनीवर जोरदार बहिष्काराच्या मागणीनंतर आता फूड डिलिव्हरी कंपनीने माफी मागितली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement