Randeep Hooda Marriage Video: अभिनेता रणदीप हुड्डाने बांधली गर्लफ्रेंड Lin Laishram शी लग्नगाठ; मणिपुरी रितीरिवाजानुसार पार पडला विवाहसोहळा (Watch)
रणदीप आणि लिन अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत व अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा केली होती.
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने आज म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड लिन लैश्राम हिच्याशी लग्नगाठ बांधली. हे लग्न वधूच्या मूळ गावी इम्फाळमध्ये पार पडले. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम मणिपुरी रितीरिवाजानुसार लग्न केले. इम्फाळमधील चुमथांग शन्नपुंग रिसॉर्टमध्ये लग्नाचे विधी होत आहेत. लग्नापूर्वी दोघेही मणिपूरमधील एका मंदिरात पूजेसाठी पोहोचले होते. रणदीप आणि लिन अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत व अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा केली होती. या जोडप्याचा प्री-वेडिंग फंक्शन 28 नोव्हेंबर रोजी झाला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (हेही वाचा: Pooja Sawant fiancé: पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? अभिनेत्री ने अखेर जाहीर केली ओळख)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)