Adipurush Controversy: हिंदू महासभेची 'आदिपुरुष' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी; दिग्दर्शक आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दिला अर्ज

चित्रपटाच्या आरोपी दिग्दर्शक आणि निर्मात्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल न केल्यास महासभा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही प्रवक्त्याने सांगितले.

Adipurush

अखिल भारतीय हिंदू महासभेने मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्यावर बनवलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हजरतगंज कोतवाली येथे अर्ज दिला आहे. महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार भगवान श्री राम यांच्यावर बनवलेल्या आदिपुरुष चित्रपटातून सनातनींना अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात प्रभू श्री राम, सीता मैय्या, हनुमानजी यांचाही अपमान करण्यात आला आहे. चित्रपटाचे चित्रण, कलाकारांची वेशभूषा, संवाद अशा अनेक बाबतीत चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत व त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. चित्रपटाच्या आरोपी दिग्दर्शक आणि निर्मात्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल न केल्यास महासभा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही प्रवक्त्याने सांगितले.

याआधी उत्तर प्रदेशमध्ये आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय लोक दलाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. (हेही वाचा: Adipurush Dialogues Controversy: आदिपुरुष चित्रपटातील विवादास्पद संवाद बदलले जाणार; Manoj Muntashir यांची माहिती)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement