टॉयलेट सीटपेक्षा 10 पट अस्वच्छ आहे तुमच्या हातातील फोन; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

जिवाणू हातावर राहू नयेत म्हणून आपण नेहमी आपले हात सॅनिटायझ करतो. परंतु जी गोष्ट आपल्या हातावरील जंतू आणि जीवाणू संपुष्टात येऊ देत नाही ती म्हणजे आपला मोबाईल.

Smartphone (PC - pixabay)

गेल्या दशकभरात, मोबाईल फोनने (Mobile Phone) आपल्या जीवनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेकांना या फोनशिवाय जगणे अवघड वाटत आहे. दिवसभरात कोणतेही काम करताना सतत आपण आपला फोन आपल्यासोबत बाळगत असतो. आपल्यासोबतच हा फोन जमिनीवर, बेडवर, खिशात, टेबलवर आपण ठेवतो. अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या हातातील फोनवर किती बॅक्टेरिया असतील? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

तुम्ही तुमचे शरीर, हात, घर, परिसर अशा सर्व गोष्टींच्या स्वच्छतेची खूप काळजी घेता, परंतु आपले आपल्या फोनकडे दुर्लक्ष होते. आपला फोन ही अतिशय अस्वच्छ वस्तू आहे. एका अभ्यासानुसार, टॉयलेट सीटच्या तुलनेत फोनवर 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपले हात स्वच्छ ठेवल्यानंतरही आपण आपल्या फोनद्वारे आपल्या हातांवर मोठ्या प्रमाणावर जंतू हस्तांतरित करतो.

कोरोनाच्या काळात लोकांनी वरचेवर हात धुण्याचा आणि स्वच्छतेचा धडा घेतला.  जिवाणू हातावर राहू नयेत म्हणून आपण नेहमी आपले हात सॅनिटायझ करतो. परंतु जी गोष्ट आपल्या हातावरील जंतू आणि जीवाणू संपुष्टात येऊ देत नाही ती म्हणजे आपला मोबाईल. एका अभ्यासानुसार, किशोरवयीन मुलांच्या मोबाईलवर किमान 17 हजार बॅक्टेरिया असतात, जे सामान्य टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त असतात. आपण आपल्या फोनला हजारो वेळा स्पर्श करतो आणि नंतर तोच हात आपल्या तोंडावर ठेवतो. या प्रकरणात, विविध संसर्गाचा धोका कायम राहतो. (हेही वाचा: Cobra Viral video: स्कूटीमध्ये लपला कोब्रा, तरुणाने उघड्या हातांनी पकडला; पाहा रोमांच आणणारा व्हिडिओ)

यावर उपाय म्हणजे, तुमचा फोन डिसइंफेक्टेंट वाइपने स्वच्छ करणे. यामुळे फोनवरील बॅक्टेरिया कमी करण्यास मदत होईल. परंतु हे लक्षात घ्या फोनच्या स्क्रीनवर वारंवार अल्कोहोल घासल्याने त्याचा डिस्प्ले खराब होऊ शकतो. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 70 टक्के जंतुनाशक हे फोनची स्क्रीन साफ ​​करण्यासाठी सुरक्षित असतात, त्यामुळे त्याच्या वापरणे तुम्ही फोनची स्क्रीन साफ करू शकता.