Sex With 'Ghost': कोलंबियातील महिलेचा भूतासोबत सेक्स केल्यास दावा; चेहरा पाहिल्यावर संपवले सर्व संबंध
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाओला फ्लोरेझने दावा केला की तिने वीस वर्षांहून अधिक काळ भूताशी लैंगिक संबंध ठेवले होते, परंतु जेव्हा तिला त्याचा चेहरा दिसला तेव्हा तिने त्याच्यासोबत सर्व गोष्टी संपवल्या.
याआधी युनायटेड किंगडमच्या ब्रिस्टल येथे एका मुलीने आपण एका भूतासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. यासोबतच भूतांशी सेक्स (Sex With Ghost) केल्याचाही दावा तिने केला होता. आता कोलंबियातील (Colombia) एका महिलेने दोन दशकांहून अधिक काळ भूतासोबत सेक्स केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच्या दिसण्यामुळे आपण हे नाते संपवले असल्याचेही तिने सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाओला फ्लोरेझने दावा केला की तिने वीस वर्षांहून अधिक काळ भूताशी लैंगिक संबंध ठेवले होते, परंतु जेव्हा तिला त्याचा चेहरा दिसला तेव्हा तिने त्याच्यासोबत सर्व गोष्टी संपवल्या. अहवालानुसार, पाओलाने सरकारी मालकीच्या चॅनल कॅनाल 1 वर प्रसारित होणार्या सिन कॅरेटा या टीव्ही शोमध्ये ही कथा कथन केली. पाओलाने असा दावा केला की ती झोपत असताना दररोज रात्री भुताटकीचे दर्शन घडते. ती लहान असतानाच हा प्रकार सुरू झाल्याचे तिने सांगितले.
तिने पुढे दावा केला की ती, हळू हळू ती या भुताच्या प्रेमात पडली. या दोघांचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. पाओलाच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी झोपेत असताना तिला आपल्या पायापासून छातीपर्यंत एक हात फिरताना जाणवला. या स्पर्शामुळे तिला भीती वाटली, परंतु एक आत्मा तिच्याशी लैंगिक संबंध ठेवू लागल्यावर तिला नक्की काय घडत आहे याची जाणीव झाली. त्यानंतर हा प्रकार रोज सुरु झाला व तब्बल 20 वर्षे चालला. मात्र एकेदिवशी तिने या भुताचा चेहरा पहिला तेव्हा सर्वकाही बदलले. (हेही वाचा: Bone Smashing Trend on TikTok: आकर्षक दिसण्यासाठी लोक हातोड्याने तोडत आहेत स्वतःच्या चेहऱ्याची हाडे; टिकटॉकवर ‘बोन स्मॅशिंग’ ट्रेंड व्हायरल, जाणून घ्या सविस्तर)
ती म्हणाली, ‘तो खूप मोठा माणूस होता. मात्र त्या भूताचा चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्याशी नाते पुढे चालू ठेवायचे नसल्याचे आपण ठरवले.’ या भुताचा चेहरा आपल्याला घाबरवतो असेही तिने सांगितले. महिलेने हे देखील कबूल केले की, ती रोज रात्री भुतासोबत जबरदस्त सेक्स एन्जॉय करायची. मात्र त्याचा चेहरा दिसल्यानंतर तिचा त्याच्यामधील रस संपला. मानसशास्त्रज्ञ मार्टिझा मॉन्टेलेग्रे यांच्या मते, पाओलासारखी प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत.