Newborn Palestinian Baby Girl Rescue Video: इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या 37 दिवसांनंतर नवजात मुलीची ढिगाऱ्यातून सुटका; पहा व्हायरल व्हिडिओ
गल्फ न्यूजच्या अहवालानुसार, युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी जन्मलेली पॅलेस्टिनी मुलगी, तिच्या कुटुंबाच्या घरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्व अडचणींपासून वाचली. विशेष म्हणजे, सुरुवातीचे हल्ले सुरू झाल्यानंतर 37 दिवसांनी बाळाला वाचवण्यात आले.
Newborn Palestinian Baby Girl Rescue Video: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, गाझा येथील ढिगाऱ्यातून एका नवजात बाळाला वाचवल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीच्या घरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर जवळजवळ 37 दिवसांनी या मुवीची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 24-सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलने बॉम्ब टाकलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून नवजात बाळाला जिवंत वाचवलेले दिसते. गल्फ न्यूजच्या अहवालानुसार, युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी जन्मलेली पॅलेस्टिनी मुलगी, तिच्या कुटुंबाच्या घरावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्व अडचणींपासून वाचली. विशेष म्हणजे, सुरुवातीचे हल्ले सुरू झाल्यानंतर 37 दिवसांनी बाळाला वाचवण्यात आले. (हेही वाचा - Israel Boy Release From Hamas Prison: हमासच्या कैदेतून चिमुरड्याची सुटका; बाप-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल)
The miracle that came after 37 days. Baby born in the first days of the war was rescued alive from the rubble of the house bombed by Israel pic.twitter.com/pDpQ4bInGi
— Gaza Notifications (@gazanotice) November 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 11:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

