केरळ: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी 'त्याने' पत्नीच्या अंगावर कोब्रा आणि रसेल व्हायपर साप सोडुन केली हत्या; पोलीस तपासात दिली कबुली
केरळच्या (Kerala) कोल्लम (Kollam) येथुन एका पतीने आपल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी चक्क तिच्या अंगावर साप सोडल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.या मध्ये त्याची पत्नी उथरा हिचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या (Kerala) कोल्लम (Kollam) येथुन एका पतीने आपल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी चक्क तिच्या अंगावर साप सोडल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यासाठी मागील महिन्याभरात त्याने दोन वेळा प्रयत्न केला होता. आधी एकदा पत्नी झोपेत असताना त्याने तिच्यावर रसेल व्हायपर (Russel Viper) या विषारी सापाला सोडले होते मात्र त्यावेळी पत्नीला जाग येऊन तिचा जीव वाचला म्हणून आता दुसऱ्या वेळीस त्याने चक्क कोब्रा (Cobra) हा महाविषारी साप तिच्या अंगावर सोडला होता. या मध्ये त्याची पत्नी उथरा हिचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघात असेल असे सर्वांना त्याने भासवून दिले होते मात्र उथरा च्या कुटुंबीयांनी संशय घेत पोलिसांना माहिती दिली, आणि त्यानंतर पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. आरोपी पतीचे नाव सुरज असे असून तो एका खाजगी बँकेत कामाला आहे, सुरजचे बाहेर प्रेमप्रकरण होते त्यामुळे आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्याने हा सर्व डाव रचला होता अशी माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासात मिळवली आहे. मुंबई: फोनवर गप्पा मारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या; पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पतीची कबुली
प्राप्त माहितीनुसार, सुरज आणि उथरा यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. त्यांना एक दीड वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. अलीकडे त्यांच्यात सतत वाद होत होते. सुरजचे बाहेर प्रेमप्रकरण होते, त्या प्रेयसीसोबत सूरजला लग्न करायचे होते तसेच सूरजला उथरा कडे असणारे सोन्याचे दागिने आणि पैसे सुद्धा हवे होते. यासाठीच त्याने तिच्या मृत्यूचा हा कट आखला होता. घटनेच्या दिवशी सुरजने अगोदरच घरात साप आणुन ठेवला होता. उथरा आणि त्यांचा मुलगा रात्री झोपला असताना त्याने हा कोब्रा साप तिच्या अंगावर सोडला. सापाने उथराला दोन वेळा दंश केल्याचे सुद्धा सुरजने पाहिले आणि मग त्याने सापाला कंटेनर मध्ये भरुन ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र साप तितक्यात निसटुन घरातील कपाटाखाली जाउन बसला. सकाळी हा सर्व प्रकार उघड झाल्यावर पोलिसांना कळवण्यात आले. पत्नीचे डोके कापून पोलिसांकडे घेऊन गेला माथेफिरू; चौकशी करताच म्हणू लागला राष्ट्रगीत, वाचा सविस्तर
दरम्यान, ही घटना 6 मे रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी सूरज आणि त्याला त्याला कोब्रा आणि रसेल व्हायपर साप आणून देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या दोघांनी पोलीस तपासात आपला गुन्हा कबुल केला आहे.