Fact Check: प्रधानमंत्री मास्क योजनेअंतर्गत मास्कचे फ्री वाटप? PIB ने सांगितले व्हायरल मेसेज मागील सत्य
त्यापेक्षा अधिक वेगाने फेक न्यूज पसरत आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटापेक्षा सोशल मीडियावरील दावे, खोटी माहिती, फेक न्यूज लोकांचा त्रास वाढवत आहेत. या फेक न्यूज भीती आणि अस्वस्थता यात भर टाकतात. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे.
भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने फेक न्यूज पसरत आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटापेक्षा सोशल मीडियावरील दावे, खोटी माहिती, फेक न्यूज लोकांचा त्रास वाढवत आहेत. या फेक न्यूज भीती आणि अस्वस्थता यात भर टाकतात. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. अशातच अजून एक बातमी व्हायरल होत आहे. त्यात मोदी सरकार प्रधानमंत्री मास्क योजने अंतर्गत फ्री मास्क देणार असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या बातमीमधील या दाव्याची प्रेस इनफॉर्मेशन ब्यूरो (The Press Information Bureau)म्हणजेच पीआयबी (PIB) ने तथ्यता तपासली. (WHO नुसार अद्याप एकही शाकाहारी व्यक्ती कोविड 19 च्या संसर्गामुळे दगावलेला नाही? असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या सत्य)
PIB नुसार ही बातमी खोटी असून असा कोणताही दावा सरकारकडून करण्यात आलेला नाही. तसंच सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केले नसल्याचेही स्पष्ट केले. तसंच अशा प्रकारच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. डोळसपणे माहिती मागील तथ्य जाणून घ्या आणि अफवा पसरवू नका, असे आवाहनही केले आहे.
व्हायरल मेसेज मागील दावा: पीएम मास्क योजनेअंतर्गत सरकार फ्री मास्कचे वाटप करणार आहे. मास्क मिळण्यासाठी मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे.
पीआयबी फॅक्ट चेक: सरकारची अशी कोणत्याही प्रकारची योजना नाही, व्हायरल मेसेज खोटा आहे. फेक न्यूजचा प्रचार करु नका.
PIB Tweet:
सोशल मीडियावर फ्री मास्क वाटपाचा दावा करणारा मेसेज खोटा असल्याचे पीआयबीने सांगितले आहेच. तसंच All India Radio कडूनही ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारची फ्री मास्क देण्याची कोणतीही योजना नसल्याचेही सांगण्यात आले आहे.