First Salary Funny Memes: सोशल मीडियात नेटिझन्सचा पहिली कमाई आणि त्याचा सोर्स शेअर करण्यावरून धम्माल मिम्स, जोक्स वायरल!

अनेकांनी आपल्या पहिल्या कमाईचा आकडा आणि वय शेअर करत ती नेमकी कुठून केली याची माहिती शेअर करताना दिसत असल्याने First Salary सध्या ट्रेडिंग मध्ये आहे.

First salary memes (Photo Credits: Twitter)

तुम्हांला तुमचा पगार किती होता हे आठवतयं? जरी रक्कमेच्या बाबतीत तो तुंटपुंजा असला तरीही पहिला पगार, पहिली कमाई ही खास असते. स्वतःच्या कष्टाने पैसे कमवल्यानंतरचा आनंद अगदीच वेगळा असतो. काहींनी काम करून अर्थाजन केले असेल तर काजी केवळ पॉकेटमनीसाठी जुगाड करून पैसे कमावले असतील. पण हे सारेच खास आहे. सध्या ट्वीटरवरही पहिली कमाई आणि कितव्या वर्षी ती कमावली याची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी आपल्या पहिल्या कमाईचा आकडा आणि वय शेअर करत ती नेमकी कुठून केली याची माहिती शेअर करताना दिसत असल्याने First Salary सध्या ट्रेडिंग मध्ये आहे. अनेक व्हेरिफाईड ट्वीटर अकाऊंटसनेही यामध्ये उडी घेत पहिला पगार शेअर केला आहे. तर ज्यांच्याकडे कमाईचा कोणताच सोर्स नाही त्यांनी आपली व्यथा देखील मजेशीर अंदाजात मांडत धम्माल मिम्स ट्वीटरवर शेअर केले आहेत.

करियरला विशिष्ट दिशा मिळेपर्यंत, अर्थाजनाचा एक ठराविक आणि मोठा आधार मिळेपर्यंत अनेकजण लहान-मोठी कामं करत, कुणी ट्युशन घेत तर कुणी कॉल सेंटरवर काम पैसे कमावले असतील. पण हे सारंच आज मागे वळून पाहताना अनेकांना आनंदुन टाकणारं आहे. WhatsApp Pay Funny Memes & Jokes: व्हॉट्सअॅप पे वरील धम्माल मीम्स आणि जोक्स सोशल मीडियात व्हायरल!

First Salary धम्माल मिम्स

गूगल पे

इंजियरिंगच्या अनेक विद्यार्थ्यांचं दु:ख

स्टॉक मार्केट

पहिली कमाई

बेरोजगारीचं दु:ख

तुमच्याकडे अजून काम नसेल तर तुमचा उत्साह मावळू देऊ नका. सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होणारे हे धम्माल मिम्स पहा. कदाचित तुम्हांलाही किमान पॉकेटमनी मिळवण्यासाठी काही आयडीयाज मिळू शकतात. तुम्ही देखील त्यांच्या मिम्ससोबत नक्कीच कनेक्ट झाला असाल.