Fact Check: न्यूमोनियाची लस कोरोना व्हायरसपासून संरक्षण देते? जाणून घ्या सत्य
न्यूमोनियाची लस कोरोनावर उपायकारक आहे. प्रेस माहिती ब्यूरोच्या (पीआयबी) फॅक्ट चेकने हा मेसेज खोटा असल्याचे सिद्ध केले. ते म्हणाले की, "जगभरातील संशोधक सध्या कोविड-19 ची लस शोधत आहेत, निमोनियाची लस कोरोना व्हायरसच्या उपचारात प्रभावी नाही."
कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी लोकं वेगवेगळे प्रकारचे उपाय करत आहे. कोरोना विषाणूशी लढणार्या वैज्ञानिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पहिले तर तो इतका अचूकपणे कसा पसरतो, ज्याचा लोकांना भयंकर परिणाम होतो, कोरोनाचा परिणाम मानवी शरीरावर कसा सोडतो, संक्रमित एका चतुर्थांश भागामध्ये काही लक्षणे का नाहीत. न्यूमोनियाचीही (Pneumonia) अशीच समस्या आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या या लॉकडाउन (Lockdown) काळात अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. कोरोनाच्या या संकट काळात सध्या सोषसील मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहे. यापैकी एक मेसेजमध्ये म्हटले आहे की न्यूमोनियाची लस कोरोनावर उपायकारक आहे. प्रेस माहिती ब्यूरोच्या (PIB) फॅक्ट चेकने हा मेसेज खोटा असल्याचे सिद्ध केले. ते म्हणाले की, "जगभरातील संशोधक सध्या कोविड-19 ची लस शोधत आहेत, निमोनियाची लस कोरोना व्हायरसच्या उपचारात प्रभावी नाही." (डॉ. मनीषा पाटील यांच्या मृत्यूच्या पोस्टवर डॉ. रिचा राजपूत यांचा फोटो; व्हायरल पोस्टवर मजेशीर ट्विट करत डॉ. रिचा यांचा खुलासा View Tweet)
पीआयबीने याबाबत सत्यता सांगत,लिहिले की, "नाही, न्यूमोनियाविरुद्ध टीका आणि वॅक्सीन नवीन कोरोना व्हायरसपासून बचाव करत नाही. हा व्हायरस नवीन आहे आणि वेगळा आहे त्यामुळे याला टीकेची गरज नाही. संशोधक कोविड-19 विरुद्ध एक टीका निर्माण करत आहे आणि जागतिक आरोग्य संघटना त्यांना त्यांच्या प्रयत्नात साथ देत आहेत. 2019-nCoVविरूद्ध हा टीका प्रभावी नसला तरी श्वसन रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी आहे."
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने बनावट बातम्या, पोस्टचे व्हायरल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे, लॉकडाउन आणि कोरोनाच्या संकट काळात सोशल मीडियावर कोणत्याही पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्या योग्य आहेत की नाही हे तपासून पाहा आणि मगच दुसऱ्यांसोबत शेअर कराव्यात असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकार सतत करत आहे.