Watch Ghost Videos: तुम्ही रात्री ऐकटे झोपता का? तर 'हे' भितीदायक व्हिडिओ पाहिल्यानंतर चुकूनही होणार नाही अंधारात झोपण्याची हिम्मत
Ghosts caught on camera (Photo Credits: Video grab)

Watch Ghost Videos: तुम्ही अनेकदा खोलीत ऐकटे झापत असतात. यावेळी कधीतरी तुमच्या मनात भूताचा विचार येता. या खोलीत भूत तर नसेल ना? असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. जगभरातील लोकांना त्यांच्या घरात काही भयानक गोष्टींचा सामना करावा लागला आहे आणि याचा पुरावादेखील त्यांनी सादर केला आहे. तुम्हाला जर भूतांचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर, तर तुम्ही खालील भयानक व्हिडिओ पाहू शकता. नेटीझन्स पॅरानॉर्मल एक्टिविटीजचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. असेच काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोक इंटरनेटवर भूतांचे व्हिडिओ शोधत असतात. आज या लेखात तुम्ही भूतांचे काही व्हिडिओ पाहू शकतात. कदाचित हे व्हिडिओ पाहून तुम्हाला भीतीदेखील वाटेल.

एका व्यक्तीने घरात भूताचे अस्तित्व जाणवलं -

एका Reddit वापरकर्त्यांनी घराबाहेर पडल्यानंतर घरात झालेल्या घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरा लावला. त्यावेळी त्याला कोणीतरी त्याच्या घरातील दरवाजे उघडल्याचे आणि बंद करण्याचे जाणवले. (हेही वाचा - Two Headed Snake Viral Video:उत्तर कॅरोलिना येथील एका महिलेच्या घरात आढळला दुर्मिळ दुतोंडी साप; पाहा संपू्र्ण व्हिडिओ)

Our motion camera finally picked up what my roommate kept telling me about (explanation in comments). from r/Ghosts

आईने स्वयंपाकघरात पाहिले मुलाचे भूत -

गेल्या वर्षी अटलांटाच्या महिलेला तिचा दिवंगत मुलगा घरी आल्याचा भास झाला. तिने आपल्या स्वयंपाकघरात एक सावली पाहिली. ही सावली पुरुषाची होती. ही घटना ती महिला टीव्ही पाहत असताना घडली. या महिलेच्या मोबाईलवर कोणीतरी स्वयंपाकघरात असल्याचा मेसेज आला. त्यानंतर ती स्वयंपाक घरात गेली, तेव्हा तिने आपल्या मुलासारखी सावली पाहिली.

व्हिडिओ पहा:

मुलीने पाहिले वडिलांचे भूत -

टेक्सासच्या एका महिलेने गेल्या महिन्यात दावा केला होता की, ती आणि तिची आई दोघेही कर्करोगाशी झुंज देत असताना घरात त्यांना तिच्या वडिलांचे भूत दिसले. जेव्हा ती तिच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिला तिच्या वडिलांचे भूत समोरच्या पोर्चमध्ये खुर्चीवर बसलेले दिसले.

व्हिडिओ पहा - 

जोडप्याला मुलाच्या खोलीत दिसली रहस्यमय सावली - 

मिशिगनच्या जोडप्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या कॅमेर्‍यात एक रहस्यमय सावली दिसली. फुटेजमध्ये मुलाच्या पाळण्यासमोर काहीतरी फिरताना दिसत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, मुलाला भूत दिसू शकते, परंतु ते त्यांना दिसत नाही. याव्यतिरिक्त, त्यांनी आपल्या मुलावरच्या अंगावर ओरखडे पाहिले. त्याचा असा दावा आहे की, हे ओरखडे भूताने केले आहे.

व्हिडिओ पहा -

वरील व्हिडिओ आपल्याला भयानक वाटत असल्यास, आज रात्री आपण एकटे झोपायला टाळाल किंवा आपण बेडरूममधील दिवे बंद करणं नक्कीच टाळाल.  (टीपः वरील व्हिडिओ मनोरंजनच्या हेतूसाठी दर्शविले आहेत. हे व्हिडिओ भूताच्या अस्तित्वाची पुष्टी करीत नाही आणि यामागे कोणालाही घाबरायचा हेतू नाही.)