Argentinian MP Kissing Girlfriend's Boobs: अर्जेंटिनामध्ये संसदेच्या ऑनलाईन सत्रादरम्यान खासदार घेऊ लागले त्यांच्या गर्लफ्रेंडच्या स्तनांचे चुंबन; द्यावा लागला पदाचा राजीनामा (Watch Video)

आजकाल लोक एकमेकांशी बोलण्यासाठी ऑनलाइन संवादाला प्राधान्य देत आहेत. राजकारणी लोकही याला अपवाद नाहीत. मात्र कधी कधी कधी या ऑनलाइन संवादामध्ये अनेक चित्र विचित्र गोष्टी पाहायला मिळतात

SS of Video of Argentinian MP Kissing Girlfriend's Boobs During an Online Parliamentary Session (Photo Credits: Twitter)

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) साथीमुळे आजकाल लोकांचे एकमेकांशी संवाद साधण्याचे मध्यम बदलले आहे. आजकाल लोक एकमेकांशी बोलण्यासाठी ऑनलाइन संवादाला प्राधान्य देत आहेत. राजकारणी लोकही याला अपवाद नाहीत. मात्र कधी कधी कधी या ऑनलाइन संवादामध्ये अनेक चित्र विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. आताही अशीच एक गोष्ट समोर आली आहे. अर्जेंटिनामध्ये (Argentina) संसद अधिवेशनाची कार्यवाही ऑनलाइन सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, इथले खासदार जुआन एमिलियो अमेरी (Juan Emilio Ameri) या ऑनलाइन सत्रादरम्यान आपल्या जोडीदारासोबत आक्षेपार्ह कृत्य करताना आढळले. चर्चा सुरु असताना ते आपल्या जोडीदाराच्या स्तनाचे चुंबन घेत होते.

सध्या या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अधिवेशन थांबविल्यानंतर चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष सर्जिओ मसा यांनी अमेरी यांच्या निलंबनाबाबत मतदान घेतले, जे अर्थातच अमेरी यांच्या विरुद्ध झाले व त्यानंतर अमेरी यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात खासदार अमेरी यांनी त्यांच्या वतीने स्पष्टीकरण जारी केले आहे. ते म्हणतात त्यांना वाटले की ते ऑफलाईन आहेत व यादरम्यान ते त्यांच्या गर्लफ्रेंडचे नवीन इम्प्लांट पाहत होते. मात्र खालच्या सभागृहाचे अध्यक्ष सर्जिओ मसा यांनी आदेश दिल्यानंतर त्यांना गुरुवारी राजीनामा द्यावा लागला.

तीन मुलांचे पिता असलेले जुआन एमिलियो अमेरी हे सध्या त्यांच्या पत्नीशी विभक्त होण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेबाबत त्यांनी स्थानिक रेडिओ स्टेशनला सांगितले, ‘मी व माझी जोडीदार दोघांनाही घडलेल्या गोष्टीमुळे त्रास होत आहे. जे घडले त्याबद्दल मला अतिशय लाज वाटत आहे आणि मला वाईटही वाटते. मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन खूप खराब आहे. माझी गर्लफ्रेंड जेव्हा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा मला वाटले की माझे कनेक्शन गेले आहे.’ (हेही वाचा: नदीच्या प्रवाहात वा-याच्या वेगासारखा धावणारा Moose प्राणी पाहून नेटिझन्स झाले हैराण; पाहा अचंबित करणारा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

दरम्यान, ही निंदनीय घटना सभागृहात पेन्शन फंड गुंतवणूकीबद्दलच्या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान घडली. टीव्ही आणि यूट्यूब वाहिन्यांमार्फत ही घटना थेट ऑनलाईन प्रसारित झाली. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, चर्चा सुरु असतानाच खासदार महाशय आपल्या जोडीदाराच्या स्तनाचे चुंबन घेऊ लागते, हे पाहून अर्जेंटिनातील खालच्या सभागृहातील सर्व सदस्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या घटनेनंतर खासदारांवर प्रचंड टीका होऊ लागली, अखेर त्यांना संसदेमधून निलंबित करण्यात आले.