Year Ender 2018 : या चांगल्या -वाईट बातम्यांनी 2018 वर्षात चर्चेत होता 'महाराष्ट्र'!

2018 सालची सुरूवात जरी भीमा -कोरेगाव हिंसाचाराने झाली असली तरीही शेवट मात्र महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांसाठी गोड बातमीने झाली आहे.

Year Ender 2018 | (Archived, edited, representative images)

Happening events at Maharashtra in 2018: येत्या काही दिवसातच आपण 2018 वर्षाला निरोप देणार आहोत. या वर्षामध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्ष अनेक घडामोडींनी भरलेलं होतं. यामध्ये काही गोष्टींमुळे आपण सुखावलो तर काही घटनांचा त्रासही झाला. पण ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.. मग पहा या वर्षामध्ये महाराष्ट्रात काय काय झालं?

भीमा - कोरेगाव दंगल ( Koregaon- Bhima violence)

2018 ची सुरूवातच महाराष्ट्रामध्ये एका दंगलीने झाली. संभाजी महाराजांच्या समाधीचा वाद रंगला आणि बघता बघता हिंसाचार पसरला. भीमा- कोरेगावसह महाराष्ट्रात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तणाव  होता.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) 

मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी अनेक प्रकारे मोर्चे, आंदोलन करण्यात आले होते. यंदा अखेर महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सामाजिक स्तरावर 16% आरक्षण देण्यात आलं आहे.  Maratha Reservation : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या जयघोषात चर्चेविना मराठा आरक्षण विधेयक मंजूर

मराठी बिग बॉस

बिग बॉस हिंदी आणि दक्षिणात्य भाषेमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यानंतर यंदा प्रथमच मराठीमध्ये बिग बॉस हा गेम शो रंगला. महेश मांजरेकर यांनी या शोचं सूत्रसंचालन केलं. मेघा धाडे ही अभिनेत्री, निर्माती या गेम शोची विजेती ठरली.

गर्भाशय प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म

आपल्या मुलीला आई होण्याचं सुख मिळावं म्हणून पुण्यात पहिली यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपणातून प्रसुती करण्यात आली. पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एका चिमुकलीने जन्म घेतला. अशाप्रकारे गर्भाशयातून प्रत्यारोपणातून बाळाला जन्म देणारी पहिलीच घटना पुण्यात घडली. पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी, चिमुकलीचा जन्म, आशियातील पहिली यशस्वी प्रसुती

महाराष्ट्र केसरी 2018 विजेता विदर्भातून

यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अनेक कारणांमुळे चर्चेमध्ये राहिली. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच काका पवार तालिमने खेळावर बहिष्कार टाकला होता. माती विरूद्ध गादी अशा रंगलेल्या सामन्यामध्ये माती विभागातुन अंतिम सामन्यापर्यंत पोहचलेला बाला रफिक शेख 2018 चा महाराष्ट्र केसरी ठरला. विदर्भातून महाराष्ट्र केसरी जिंकणारा बाला रफिक पहिलाच पेहलवान आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 , पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते

सातवं वेतन आयोग

महाराष्ट्राच्या शासकीय कर्मचार्‍यांना यंदा सरकारने सातवं वेतन आयोग जाहीर आणि मंजुर केलं आहे. नव्या वर्षाची सुरूवात याच गोड बातमीने होणार आहे. शासकीय कर्मचार्‍यांना 2019च्या जानेवारीमध्ये हे वेतन हातामध्ये मिळणार आहे.7th Pay commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; राज्य सरकारकडून नववर्षाची भेट

2018 सालची सुरूवात जरी भीमा -कोरेगाव हिंसाचाराने झाली असली तरीही शेवट मात्र महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांसाठी गोड बातमीने झाली आहे. येणारं नवं वर्ष तुमच्या प्रत्येकासाठी खूप सार्‍या नव्या आशा, अपेक्षा, संधी, आणि आनंदाची वार्ता घेऊन येणारी ठरो ! हीच सदिच्छा.