Nagpur BDSM Sex Death: पॉर्न फिल्म बघून सेक्स करण्याचा नादात मृत्यू झालेल्या तरूणाच्या प्रेयसीला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

नागपूर (Nagpur) येथे मोबाईलवर पॉर्न फिल्म (Porn Videos) पाहून वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक संबंध प्रस्थापित करण्याचा नादात एका तरूणाचा गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (7 जानेवारी) घडली. त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.

Nagpur BDSM Sex Death: पॉर्न फिल्म बघून सेक्स करण्याचा नादात मृत्यू झालेल्या तरूणाच्या प्रेयसीला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: iStock)

नागपूर (Nagpur) येथे मोबाईलवर पॉर्न फिल्म (Porn Videos) पाहून वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक संबंध प्रस्थापित करण्याचा नादात एका तरूणाचा गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (7 जानेवारी) घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्ती हा विवाहित असून तो आपल्या प्रेयसीसोबत खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर गेला असताना ही घटना घडली. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तरुणांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी नंतर आता त्या तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच येत्या 7 जानेवारीपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हा विवाहित असून त्याचे अन्य दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. गुरुवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यानंतर खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या महाराजा लॉजवरील एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये शाररिक संबंध झाले. त्यावेळी पॉर्न फिल्म पाहून तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक सबंध प्रस्थापित करण्यासाठी दोरीचा उपयोग केला. त्यानंतर तरूणाने खुर्चीवर हात आणि पाय दोरीने बांधले पुढे तीच दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा गुंडाळली. थोड्या वेळाने तरुणी स्वच्छता गृहात गेली. मात्र, खुर्चीवर दोरीने बांधलेला तरुण तसाच होता. काहीवेळाने तो खुर्चीसह खाली कोसळला, दुर्दैवाने त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना कशी घडली हे कोणालाही कळले नाही. अखेरीस तरुणीने पोलिसांना माहिती दिली आणि घटनेचा उलगडा झाला. हे देखील वाचा- Nashik Minor Girl Gang Rape Case: नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांना अटक

मात्र, तरूणाच्या मृत्युबाबत त्यांच्या नातेवाईंकाना वेगळाच संशय आला. ज्यामुळे त्यांनी तरुणीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरूणीनेच आपल्या मुलाची हत्या केली आहे, असा आरोपही तरुणाचे आईवडिल करत आहेत. सध्या याप्रकरणाला नवीन वळण मिळाल्याचे पाहायला मिळत असून पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2021 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).