Western Railway Special Suburban Train: मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी 350 ऐवजी 500 गाड्या येत्या 21 सप्टेंबर पासून धावणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
याबद्दल ANI यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील मुंबईत (Mumbai) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच कारणास्तव आता मुंबईत कालपासून जमावबंदी येत्या 30 सप्टेंबर पर्यंत लागू केली आहे. मात्र अन्य कोणत्याही नियमात मुंबई पोलिसांकडून बदल करण्यात आलेला नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर आता पश्चिम रेल्वेने (Western Railway) सुद्धा कोरोनाग्रस्तांचा शहरातील एकूणच वाढता आकडा पाहता 350 ऐवजी 500 लोकल येत्या 21 सप्टेंबर पासून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल ANI यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.(Aaditya Thackeray On Section 144 In Mumbai: मुंबईत कलम 144 अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत लागु होणार्या जमावबंदी नियमावर आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण)
पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल सेवेसंदर्भात असे म्हटले आहे की, लोकलमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन आणि वाढती गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 500 लोकल उपयनगरीय सेवेसाठी रुजू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या लोकल सेवा ही सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या लोकलने प्रवास करु शकतात. मात्र त्यांना कामावरील आयडी कार्ड दाखवल्यानंतरच रेल्वे स्थानकात प्रवेश देत प्रवासासाठी मुभा दिली जात आहे. (Mumbai Metro: मुंबई मेट्रो लाईन 2B वरील Kurla Terminus व MMRDA Station रद्द; जाणून घ्या कारण)
दरम्यान, आता मुंबई लोकलने वकिलांना सुद्धा प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा आजपासून ते येत्या 7 ऑक्टोंबर पर्यंत कायम राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवण्यात आलेल्या लोकल सुरु करता येऊ शकतात. मात्र राज्य सरकारची यासाठी परवानगी असणे अत्यावश्यक आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमेन वाय. के. यादव यांनी नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्यासोबत गुरुवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात असे म्हटले आहे की, मुंबईतील लोकल ट्रेनच्या व्यतिरिक्त उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण अनलॉक-4 नुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच यामधून प्रवास करता येत आहे.