Voter Cards Discovered In Garbage: जालना मध्ये कचर्‍यात आढळली मतदार ओळखपत्रं; अधिक तपास सुरू असल्याची जिल्हाधिकार्‍यांची माहिती

कोणी जाणूनबुजून ही कार्ड टाकली का? त्याला ते कुठून मिळाले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

Voter Cards Discovered In Garbage: जालना मध्ये कचर्‍यात आढळली मतदार ओळखपत्रं; अधिक तपास सुरू असल्याची जिल्हाधिकार्‍यांची माहिती
jalna Voters Card | Twitter

जालना मध्ये 13 मे दिवशी होणार्‍या आगामी लोकसभा निवडणूकीच्या मतदानापूर्वी कचर्‍यात मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची जालना जिल्हाधिकारी Dr Shri Krishnanath Panchal यांनी माहिती घेतली आहे. सापडलेली ही मतदार ओळखपत्रं जुनी आहेत. ती अज्ञात व्यक्तीने टाकली आहेत. आम्हाला माहिती मिळताच जालना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ती मतदार ओळखपत्रं तात्काळ जप्त केल असून पुढील तपास असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींची मतदार ओळखपत्रे सापडली आहेत, त्यांना निवडणूक आयोगाकडून नवीन कार्ड मिळाले आहे का, याचाही तपास सुरू आहे. कोणी जाणूनबुजून ही कार्ड टाकली का? त्याला ते कुठून मिळाले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटलं आहे. Voter ID Card Application: मतदार कार्ड साठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज कसा कराल? पहा आवश्यक कागदपत्रं ते स्टेटस कसं तपासाल? 

जालना मध्ये आढळली कचर्‍यात मतदार ओळखपत्रं

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 10, 2024 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).