Viral Video: पेट्रोल पंपावर गुंडांची दादागिरी! पेट्रोल पंप चालक महिलेला गुंडांनी पडायला लावले पाय

जिथे एका पेट्रोल पंप चालक महिलेला गुंडांनी पायाला हात लावून माफी मागायला लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Credit-(X ,@News18lokmat)

Viral Video: उत्तर प्रदेशमध्ये महिला आणि मुलींवर हल्ले आणि अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना आता महाराष्ट्रातील नागपूरमध्येही एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. जिथे एका  पायाला हात लावून माफी मागायला लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही महिला पेट्रोल पंपावर अनेक लोकांच्या पायाला स्पर्श करताना पाहू शकता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ३ जणांना अटक केली आहे. ही घटना नागपूरच्या एमआयडीसी संकुलातील पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. हे देखील वाचा: Sanatan Temple Board: मुस्लिम वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर मंडळाची निर्मिती करण्याची मागणी; एक हजार हिंदू मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी शिर्डीमध्ये येणार एकत्र

पेट्रोल पंपावर गुंडांनी महिलेला पाय पडून माफी मागायला लावली, पाहा व्हिडीओ 

मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला सुचित्रा लोहकरे या इलेक्ट्रिक झोन चौक, हिंगणा रोड, नागपूर येथील पेट्रोल पंपावर काम करत होत्या. यावेळी पेट्रोल पंपावर आलेले दोन तरुण दुचाकीवरून इकडे तिकडे फिरू लागले आणि महिलेने त्यांना काहीतरी सांगितले. यानंतर दोन्ही तरुणांनी महिलेशी वाद घातला आणि तिला धक्काबुक्की केली. काही वेळाने हे आरोपी आपल्या काही साथीदारांसह पेट्रोल पंपावर पोहोचले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. यानंतर त्यानी पीडितेला माफी मागायला लावली.

यादरम्यान पीडितेने माफी मागितली, मात्र राजेश मिश्रा नावाच्या आरोपीने सांगितले की, 'तुझा ज्या तरुणाशी वाद झाला त्याच्या पाया पडून तू माफी माग. पेट्रोल पंपावर अनेक लोकांची उपस्थिती असल्याने पीडितेने काही लोकांच्या पायाला हात लावून माफी मागितली. कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दाखल घेतली आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास करत राजेश मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली.

नागपुरात घडली ही घटना

नागपुरात गेल्या आठवडाभरापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जिथे नागपूर शहरातच मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे उपस्थित असतात. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही हिंगणासारख्या परिसरातील पेट्रोल पंपावर अशी घटना घडणे पोलिसांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही. @News18lokmat या हँडलवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif