Priyansh Arya IPL Century : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात प्रियांश आर्यची दमदार कामगिरी; सर्वात जलद शतक ठोकणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू
PBSK vs CSK 22nd Match Priyansh Arya Maiden IPL Century: पंजाबचा युवा फलंदाज प्रियांश आर्यने (Priyansh Arya) चेन्नई (CSK) विरुद्ध शतकी खेळी खेळत नवा इतिहास रचला आहे. कालच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर संघाची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने एका मागून एक विकेट पडत असताना युवा सलामीवीराने 39 चेंडूत शतक पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादच्या इशान किशननंतर यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
दुसरे जलद शतक
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय खेळाडूच्या भात्यातून आलेली ही दुसरी जलद शतकी खेळी ठरली. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा युसूफ पठाणच्या नावे आहे. त्याने 37 चेंडूत आयपीएलमध्ये शतक झळकावले होते.Irfan Pathan Dropped from IPL 2025: स्टार खेळाडूबद्दल वक्तव्याचा इरफान पठाणचा 'तो' व्हिडीओ अखेर समोर; आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून पत्ता कट झाल्याने चर्चेत
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारे फलंदाज
ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, 2013
युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2010
डेविड मिलर (पंजाब) विरुद्ध आरसीबी, मोहाली, 2013
ट्रॅविस हेड (हैदराबाद) विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, 2024
प्रियांश आर्य (पंजाब) विरुद्ध सीएसके, मुल्लापूर, 2025
युसूफ पठाणनंतर आता प्रियांश आर्य हा पंजाब किंग्जच्या फ्रँयायझी संघाडून सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाजही ठरला आहे. याआधी 2013 मध्ये डेविड मिलरनं या फ्रँचायाझी संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 38 चेंडूत शतक झळकावले होते.
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2025 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

