IPL Auction 2025 Live

Unnatural Sex: 'माझ्यावर काळी जादू करत केला अनैसर्गिक संभोग', IIT च्या समलैंगिक तरुणाची पोलिसात धाव, जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

एफआयआरमध्ये फिर्यादीने असेही आरोप केले आहेत की, आरोपींनी तांत्रिक सेक्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे हात-पाय व मान बांधून शरीराच्या विविध भागावर चटके दिले.

Gay Dating App Grindr (PC - grindr.com )

आयआयटी-बॉम्बे (IIT-Bombay) येथील एका 33 वर्षीय गे पीएचडी विद्यार्थ्याने एका जोडप्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेऊन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी शनिवारी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, परंतु अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याची दोन वर्षांपूर्वी ग्राइंडर अॅपवर या जोडप्याशी भेट झाली होती. हे जोडपे सुशिक्षित आहे आणि त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत

विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार, आरोपी जोडप्याने त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले, तसेच त्याला आपले लैंगिक गुलाम बनवले. इतकेच नाही तर या विद्यार्थ्याचा जीव जाऊ शकेल अशा पद्धतीने त्याचा गळाही पकडला.

एफआयआरमध्ये फिर्यादीने असेही आरोप केले आहेत की, आरोपींनी तांत्रिक सेक्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे हात-पाय व मान बांधून शरीराच्या विविध भागावर चटके दिले. या प्रकरणाबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, ‘आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि सध्या तक्रारदाराने केलेल्या आरोपांची चौकशी करत आहोत. आम्हाला पुरेशी माहिती मिळाल्यावर आम्ही या प्रकरणात अटक करू.’ हेही वाचा: व्यक्तीने लग्नाआधी लपवली तो समलैंगिक असल्याची माहिती; पत्नीला बसलेल्या मानसिक आघातासाठी नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश)

दरम्यान याआधी नोएडा येथे ऑनलाइन डेटिंग ग्राइंडर अॅपच्या माध्यमातून काही तरुणांनी एका तरुणाची लाखोंची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली होती. तरुणाला धमकावून, स्वत: गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्याच्या एटीएममधून दोन लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. आरोपी विकी चंडिला, अमित राजपूत आणि भोला यांना मोबाईल फोन व एकूण 16,500/- रुपये व क्रेडिट कार्डसह अटक केली होती.