Uddhav Thackeray on Governor Koshyari: 'बाप बाप असतो, तो नवा किंवा जुना नसतो'; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका

अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातचं आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांवर टीकास्त्र डागलं आहे.

Uddhav Thackeray (PC - Twitter/ANI)

Uddhav Thackeray on Governor Koshyari: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेचं तापलेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसात सर्वत्र दिसून येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातचं आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांवर टीकास्त्र डागलं आहे. ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना म्हटलं आहे की, 'हे सरकार आल्यापासून सातत्याने महाराष्ट्राचा अपमान होत आहे. मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही कारण राज्यपाल पदाचा आदर केला पाहिजे आणि मी करतो. मात्र कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यापूर्वी त्यांनी ठाणे, मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांचा अपमान केला होता.

आता खूप झाले, त्यांनी आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जुना आदर्श म्हणून केला आहे. जुना आदर्श म्हणजे काय? म्हणूनच आमचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख एक उत्तम उदाहरण देत म्हणाले होते की, बाप हा बाप असतो. नवीन बाप-जुना बाप हे काय आहे? त्यामुळे अशा लोकांना तातडीने पदावरून हटवावे. (हेही वाचा - Sharad Pawar on Governor Koshyari: राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा; शरद पवार यांची मागणी)

ठाकरे इथेच थांबले नाहीत, त्यांनी कोश्यारी यांना टोमणा मारला आणि ते अॅमेझॉनचे पार्सल असल्याचे त्यांनी म्हटले. यासंदर्भात पुढे बोलताना उद्धल ठाकरे म्हणाले की, 'काही दिवस वाट पाहू. हे Amazon पार्सल परत गेले तर चांगल आहे, नाहीतर या पार्सलला परत पाठवावे लागेल. महाराष्ट्रातील कोणीतरी कर्तृत्ववान व्यक्ती या ठिकाणी यावी. अन्यथा आपल्याला काहीतरी करावे लागेल, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. (हेही वाचा -Bhagat Singh Koshyari Controversial Statement: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य,  म्हणाले “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”)

कोश्यारींच्या बोलण्यात भाजपची विचारधारा आहे का?

ठाकरे म्हणाले की, सध्या केंद्रात कोणतेही सरकार असले तरी ते राज्यपाल बनवून आपल्या माणसाला राज्यांमध्ये पाठवते त्याचप्रमाणे कोश्यारीजींनाही पाठवले आहे. ते म्हणाले की कोश्यारी जी आता जे काही बोलले आहेत, ती भाजपची विचारधारा आहे का?

आता सहन होत नाही - उद्धव ठाकरे

आता या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर पुढे आणखी त्रास सहन करावा लागू शकतो. मी सर्वांना आवाहन करतो की, महाराष्ट्र राहिला तर पक्ष राहील. त्यामुळे राज्याची अस्मिता आणि स्वाभिमान दुखावला जात असेल तर आपण संघटित होऊन विरोध केला पाहिजे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif