Chief Minister's Relief Fund: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत 197 कोटी रुपये जमा

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे राज्याला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे राज्याला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. एवढचे नव्हेतर या भयंकर माहामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे. यातच कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या (Chief Ministers Relief Fund) स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला संपूर्ण राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात राजकीय नेते, कलाकारांसह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण 197 कोटी रुपये जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनापासून आभार मानले आहेत.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे, बुधवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात बाधितांचा आकडा हा आता 1895 वर पोहोचला आहे.  दरम्यान, कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याला अर्थिक संकाटाला समोरे जावा लागत आहे. यातच या निधीत 83 वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी 25 लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत 197 कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. हे देखील वाचा- Covid-19: पुणे येथील रूबी हॉल रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाचा संसर्ग; संपर्कात आलेल्या 30 नर्सच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का

मुख्यमंत्री सहाय्यता निधी खात्याची महिती खालीलप्रमाणे-

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड- SBIN0000300

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement