Mumbai मध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; Local सेवा राहणार बंद
मुख्य म्हणजे मुंबईमध्ये लोकल (Mumbai Local) सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता त्याचे उत्तर नाही असे आहे.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. 7 जूनपासून त्यामध्ये शिथिलता आणत अनलॉकसाठी 5 टप्पे ठरविण्यात आले आहेत. आता पुण्यासह काही ठिकाणी एक आठवड्यानंतर लॉकडाऊनमध्ये अजून शिथिलता आणली जाणार आहे. सध्या मुंबई (Mumbai) तिसऱ्या टप्प्यात असून 7 जूननंतर पुढील आठवड्यात मुंबईकरांना अजून दिलासा मिळतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मुख्य म्हणजे मुंबईमध्ये लोकल (Mumbai Local) सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता त्याचे उत्तर नाही असे आहे.
आज प्रशासनाने तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, लोकल ट्रेनमधून दाटीवाटीने प्रवास करणारे लाखो प्रवासी, तसेच भारतीय हवामान खात्याने मुंबईला येत्या काही दिवसात दिलेला अतिवृष्टीचा इशारा, या बाबी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात येणाऱ्या अडचणी येणार आहेत. त्यामुळे बीएमसीने सध्या सुरू असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात तरी मुंबईकरांसाठी लोकल सुरु होणार नाही.
(हेही वाचा: Covid-19 Vaccine: खासगी रुग्णालयांसाठी कोरोना व्हायरस लसींचे दर निश्चित; जास्त रक्कम आकारल्यास होणार कारवाई- BMC)
सध्या मुंबईमध्ये सकारात्मक दर 4.40 टक्के एवढा आहे. तर ऑक्सिजन बेड्स व्याप्तीचे प्रमाण 27.12 टक्के एवढे आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्या रुग्णांचे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत गेले आहे. दरम्यान, मुंबई मध्ये आज कोरोना विषाणूचे 696 रुग्ण आढळले असून, 24 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज शहरत 658 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या शहरात 15819 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.