Karuna Munde यांना 30 लाखांचा गंडा; बांधकाम कंपनीत नफ्याचे आमिष दाखवून तिघांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल

बांधकाम कंपनीत नफ्याचे आमिष दाखवून तिघांनी 30 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karuna Sharma | | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या करुणा मुंडे (Karuna Munde) या फसवणूकीच्या शिकार बनल्या आहे. बांधकाम कंपनीत नफ्याचे आमिष दाखवून तिघांनी 30 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणारे तिघे हे धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील असल्याने त्यांच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक केली होती, असंही करुणा मुंडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितलं.

करुणा मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी राज्याचा दौरा केला. यावेळी नवा पक्ष सुरू करण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्हाला कंपनीत संचालक करतो आणि आम्ही तुमच्या पक्षाचे काम करतो, असे सांगत धनंजय मुंडेंच्या संपर्कातील आरोपी भारत संभाजी भोसले, विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष आभंग या तिघांनी आपली फसवणूक केली, अशी तक्रार करुणा मुंडे यांनी संगमनेर पोलिसांत केली आहे. (हेही वाचा - Kirit Somaiya Vs Anil Parab: अनिल परब कथित रिसोर्ट प्रकरणी चलो दापोलीची हाक देत भाजप नेते किरिट सोमय्या दापोलीत दाखल)

करुणा मुंडे यांनी आरोप केलेल्या तिघांविरुद्ध फसवणूक केल्याचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भारत भोसले कामानिमित्त धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार येत होते. त्यावेळी त्याचा परिचय झाला होता. जानेवारी 2022 मध्ये आरोपी भारत, विद्या अभंग व प्रथमेश अभंग मुंबईला मुंडे यांच्या घरी आले होते. यावेळी भोसले म्हणाले आम्हाला पक्षात घ्या विभागून खर्च करू, त्यामुळे पक्ष स्थापणेसाठी बोलणी सुरू केली, असेही करुणा मुंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement