ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय तरीही लग्नात 700 जणांची उपस्थिती, आयोजकांवर FIR दाखल

तरीही लग्नात 700 जणांची उपस्थिती दिसून आली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit-PTI)

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. तर कोरोनाच्या नव्या लाटेमुळे परिस्थिती आणखीच बिघडत चालली आहे. अशातच आता मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अचानक गेल्या काही दिवसांपासून वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन सुद्धा लागू करण्यात आला आहे. तरीही सुद्धा नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशातच ठाणे येथून एक बातमी समोर आली असून कोरोनाच्या परिस्थितीत लग्नसमारंभाला मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही लग्नात 700 जणांची उपस्थिती दिसून आली.(Parbhani Lockdown: परभणी मध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊन; सहकार्य करण्याचे नवाब मलिक यांचे नागरिकांना आवाहन) 

लग्नात 700 जणांनी उपस्थिती लावल्यानंतर आयोजनकांवर पोलिसांकडून एफआयार दाखल करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने गुरुवारी असे म्हटले की, हा कार्यक्रम 10 मार्चला आयोजित करण्यात आला होता. कल्याण पूर्वेला एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी ऐवढ्या मोठ्या संख्यने लोकांनी उपस्थिती लावल्यानंतर महापालिकेचे अधिकारी लग्नसमारंभात पोहचले तेव्हा त्यांना तेथे गर्दी दिसली.(Coronavirus in Mumbai: मागील दोन महिन्यात मुंबईमध्ये 90 टक्के कोरोनाचे रुग्ण हे उंच इमारतीमधील रहिवासी; झोपडपट्टी आणि चाळींमध्ये आढळले फक्त 10 टक्के रुग्ण)

एका अधिकाऱ्याने असे म्हटले की, राज्य सरकारने कोरोनाच्या मार्गदर्शक सुचना दिल्या असल्या तरीही लग्नात 50 हून अधिक लोकांना सहभागी होण्यास परवानगी नाही आहे. पण लग्नात नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्याचसोबत लोकांनी मास्क घालण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन केले नव्हते.आयोजक राजेश म्हात्रे आणि महेश राउत यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif