CM Fund Scam द्वारे स्वत:च्या खात्यात 89 लाख रुपये जमा करणाऱ्या ठाण्यातील डॉक्टरला बेड्या
या गुन्ह्यामध्ये डॉक्टरांच्या टोळीचा समावेश होता.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (CM Fund) 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या गैरव्यवहारची घटना गुन्हे शाखेने 2019 मध्ये उघडकीस आणली होती. या गुन्ह्यामध्ये डॉक्टरांच्या टोळीचा समावेश होता. या टोळीतील अजून एका डॉक्टरला ठाणे (Thane) येथून अटक करण्यात आली आहे. डॉक्टर सतीश मोहिते (49) यांना शुक्रवारी क्राईम ब्रांचने अटक केली. हे या गुन्ह्यातील अटक होणारे सातवे आरोपी आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी असलेल्या निधीतून डॉक्टरने पैसे आपल्या खात्यात वळते केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डॉक्टर मोहिते यांची ठाण्यातील वागळे इस्टेट येथे अष्टविनायक हॉस्पिटल आणि आरोग्यधन अशी दोन हॉस्पिटल्स आहेत.
2019 च्या प्रकरणात फसवणूक, बनावट आणि गुन्हेगारी षड्यंत्राचा आरोप आहे. तपासादरम्यान असे दिसून आले की, नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2019 दरम्यान मोहिते यांच्या नावे असलेल्या दोन बँक खात्यांमध्ये 89 लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. दरम्यान, मदत निधीतून एक कोटी रुपये काढून घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Sangli Shocker: पैशांचे लोभी! मृत रुग्णांवर दोन दिवस उपचार, इस्लामपूर येथून डॉक्टरला अटक; सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ)
2019 च्या प्रकरणात फसवणूक, बनावट आणि गुन्हेगारी षड्यंत्राचा आरोप आहे. तपासादरम्यान असे दिसून आले की, नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2019 दरम्यान मोहिते यांच्या नावे असलेल्या दोन बँक खात्यांमध्ये 89 लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. दरम्यान, मदत निधीतून एक कोटी रुपये काढून घेतले आणि या दोन बँक खात्यातून मोठ्या रक्कमा या प्रकरणातील मुख्य आरोपी आरती सिघवन उर्फ अमृतेच्या खात्यात वर्ग केल्या, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 2019 मध्ये डॉ.अनिल नगराळे, सिघवन, तिचे पती नितीन अमृते आणि कथित संदेश मोगविरा, विजय घाटलीकर आणि गणेश मुदलियार यांना बनावट बिले सादर करून निधीतून 75 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली होती.
आरोपींनी अशा लोकांचे 64 बोगस अर्ज सादर केले ज्यांना जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असल्याचे दाखवले आहे. हा अर्ज फेक लॅबच्या अहवालांसह जोडण्यात आला होता आणि मुख्यमंत्री मदत निधीतून बिले मंजूर करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे आणि न्यायालयाची परवानगी घेऊन तपास खुला केला. आतापर्यंत स्टार साक्षीदारांसह एकूण 117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.