Cryptocurrency Investment Scam Thane: ठाणे येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळा; एकाची 26 लाख रुपयांची फसवणूक
Thane Crime News: क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात ठाण्यातील रहिवासी आणि त्याच्या मित्रांनी तब्बल ₹26 लाख गमावले. आरोपींनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. फसवणूक कशी घडली आणि पोलिस तपास कसा सुरू आहे, याबाबत घ्या जाणून.
ठाणे येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळा (Cryptocurrency Scam Thane) उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात एका 41 वर्षीय व्यक्तीची कथीतरित्या फसवणूक (Financial Cheating) झाली आहे. या व्यक्तीने ठाणे पोलीसांमध्ये फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, पीडित आणि त्याच्या तीन मित्रांची या टोळीने 26.02 लाखां रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीद्वारे (Investment Fraud) मोठा फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ज्यामुळे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास आरोपी आणि त्याचे मित्र तयार झाले. मात्र, पुढे आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आपण पोलिसांमध्ये तक्रार दिल्याचे पीडिताने म्हटले आहे.
ठाण्यात कसा घडला क्रिप्टोकरन्सी घोटाळा?
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ठाणे येथील गुंतवणूक घोटाळा प्रकरणात तक्रारदाराला गुंतवणुकीच्या संधीबद्दल एका मित्राच्या माध्यमातून कळले. ज्याने त्याला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये कथीतपणे अनुभवी असल्याचा दावा करणाऱ्या जालना येथील एका गटाशी त्याची ओळख करून दिली. आरोपींनी त्यांच्या स्वतःच्या गुंतवणूकीतून लक्षणीय नफा कमावल्याची बढाई मारली आणि पीडितांना त्यांच्या योगदानावर दरमहा 12-15% परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी आरोपींनी 14,000 ते 15,000 रुपये किंमतीच्या क्रिप्टोकरन्सी नाण्याचे मूल्य अखेरीस प्रति नाणे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल, असे पीडितांना पटवून दिले. आरोपींनी अशीही हमी दिली की, की, जर काही समस्या उद्भवली तर मुद्दल रक्कम परत केली जाईल. ज्यामुळे आरोपींचा विश्वास आणखीच दृढ झाला. (हेही वाचा, Ahmedabad Cryptocurrency Scam: अहमदाबाद येथील अभियंता क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा बळी, एक कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान)
पैसे दिले पण परतावा नाहीच
दरम्यान, तक्रारदार आणि त्याच्या मित्रांनी मार्चपर्यंत 3 कोटी रुपये देण्याचे आश्वासन देऊन आरोपीला 26.02 लाख रुपये हस्तांतरित केले. पीडितांकडून लाखोर रुपयांची रक्कम मिळवल्यानंतर आरोपींचा प्रतिसाद कमी झाला. इकडे पीडितांची धाकधूक वाढत होती. शेवटी त्यांनी बक्कळ नफ्याच्या आमिषाने आरोपींशी संपर्क साधला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडितांच्या संशय आला आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. (हेही वाचा, Online Share Trading Scam: बायकोचा सल्ला ऐकला, बँक मॅनेजरही फसला; ऑनलाइन शेअर ट्रेडिंग स्कॅममध्ये सायबर फ्रॉड, 44 लाख रुपयांचा गंडा)
आरोपी अनेक प्रकरणात आगोदरच दोषी
दरम्यान, पीडितांनी त्यांच्या पातळीवर घेतलेल्या मारहितीमध्ये पुढे आले की, आरोपी हा लोकांची नेहमीच फसवणूक करत असतो. तो सातत्याने अशा प्रकरणांमध्ये गुंतलेला असतो. या आधीही त्याने अनेकांना गंडा घातला असून त्याची पार्श्वभूमी आर्थिक गुन्हेगारीशी संबंधित आहे. त्याच्या विरोधात जालना, ठाणे आणि इचलकरंजी येथे गुन्हे दाखल आहेत. अधिकाऱ्यांनी संशयितांशी संबंधित मालमत्ता देखील जप्त केल्या आहेत.
भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या व्याज संरक्षण (वित्तीय आस्थापनांमध्ये) कायद्याच्या संबंधित कलमांखाली फसवणूक आणि विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि पीडितांचा निधी वसूल करण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, असामान्य, उच्च परताव्याचे आश्वासन देणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींबाबत संपर्क साधताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. ओळखपत्रांची योग्य पडताळणी आणि आर्थिक तज्ञांशी सल्लामसलत केल्याने अशा घोटाळ्यांना बळी पडणे टाळण्यास मदत होऊ शकते. नागरिकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सतर्क राहणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)