नवी मुंबई: कळंबोली येथील सुधागड शाळेजवळ बॉम्ब सापडल्याने खळबळ
नवी मुंबई जवळील कळंबोली येथील सुधागड शाळेजवळ बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई (Navi Mumbai) जवळील कळंबोली (Kalamboli) येथील सुधागड शाळेजवळ (Sudhagad School) बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशामन दलाचे पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बॉम्ब निकामी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
पहा व्हिडिओ:
आज सकाळी मुंबईतील सिद्धीविनायक मंदीर उडवून देण्याचे धमकीपर पत्र विवियाना मॉल मध्ये सापडले. या प्रकरणी केतन घोडके या तरुणाला विक्रोळी येथून अटक करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.